Publish Date: Wed, 15 May 2019 (11:05 IST)
Updated Date: Wed, 15 May 2019 (11:08 IST)
ठाण्यातील अंबरनाथमध्ये पश्चिम भागातील कोहोजगार येथे राहणारा अमित भंडारी यांच्या अॅपल कंपनीच्या आयफोन 6 या मोबाइलचा स्फोट झाला आहे. यामध्ये अमित भंडारी हा तरुण जखमी झाला आहे. सदरची घटना रविवारी रात्री ही घटना घडली. गेल्या वर्षभरापासून आय ६ हा फोन वापरत होता. रविवारी रात्री घरी आलेल्या अमितने नेहमीप्रमाणे आपला आयफोन चार्जिंगसाठी लावला होता. यावेळी मोबाइलमध्ये मेसेज वाचत असतानाच अचानक मोबाइलचा स्फोट झाला.
या स्फोटात अमितचे दोन्ही पाय भाजले. स्फोट होताच अमितने मोबाइल हातातून गादीवर फेकला, त्यामुळे कापसाच्या गादीलाही आग लागली. याप्रकरणी आयफोन कंपनीकडे तक्रार करणार असल्याचं अमितनं सांगितलं आहे.