Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कोणत्याही क्षणी उच्च न्यायालयाचा निकाल येऊ शकतो

कोणत्याही क्षणी उच्च न्यायालयाचा निकाल येऊ शकतो
सिंचन विभागातील घोटाळ्याप्रकरणी सध्या उच्च न्यायालयात केस दाखल असून, कोणत्याही क्षणी उच्च न्यायालयाचा निकाल येऊ शकतो, असा इशारा राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोलापुरात आयोजित पत्रकार परिषदेत दिला. अजित पवार यांच्या प्रकरणात उच्च न्यायालयाला आवश्यक ती कागदपत्रे आम्ही तत्परतेने पुरवत असून, कोणत्याही क्षणी त्याचा निकाल येण्याची शक्यता आहे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
 
यावेळी माढ्याचे राष्ट्रवादीचे उमेदवार संजय शिंदे यांच्या संबंधित तीन साखर कारखान्यांची चौकशी करणार असल्याचं सांगितलं. शेतकऱ्यांच्या नावावर त्यांच्या साखर कारखान्याने पैसे उचलले आहेत. त्यामुळे त्यांची चौकशी होईल, असं पाटील म्हणाले. रत्नाकर गुट्टे यांना आत जावे लागले आहे, त्यामुळे संजय शिंदे यांच्यावरसुद्धा कारवाई होणार असल्याचं पाटील यांनी सांगितलं.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पाकिस्तानमध्ये बायकोच्या मनाविरुद्ध दुसरं लग्न केल्यामुळे भोगावी लागली शिक्षा