Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

इस्लाम धर्म हाच देशाचा खरा शत्रू -संभाजी भिडेंच्या वादग्रस्त विधानामुळे वादाचे संकेत

इस्लाम धर्म हाच देशाचा खरा शत्रू -संभाजी भिडेंच्या वादग्रस्त विधानामुळे वादाचे संकेत
, शुक्रवार, 18 मार्च 2022 (11:42 IST)
आपल्या वादग्रस्त विधानांनी नेहमी चर्चेच राहणारे शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी भिडे गुरुजी पुन्हा एकदा वादात सापडण्याची शक्यता आहे. पुणे जिल्ह्यातील शिरुर येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान मास निमीत्त उपस्थित कार्यकर्त्यांना भिडे गुरुंजींनी संबोधित केलं. यावेळी पत्रकारांशी बोलत असताना भिडे गुरुजींनी हिंदु-मुस्लीम समाजात तेढ निर्माण होणारं वक्तव्य करत नव्या वादाला तोंड फोडलं आहे.
 
इस्लाम धर्म हाच खरा देशाचा शत्रू आहे असं वक्तव्य करत भिडे गुरुजींनी देशातील मुस्लीम समुदायाची तुलना औरंगजेबाशी केली आहे.
 
नेमकं काय म्हणाले संभाजी भिडे गुरुजी?
 
देशासाठी आणि हिंदू धर्मासाठी ऐन तारुण्यात संभाजी महाराजांनी बलिदान पत्कारले पण धर्म सोडला नाही.
 
छत्रपती संभाजी महाराजांचा बलिदान मास पाळत असताना हिंदुस्थानातील प्रत्येक हिंदुने छत्रपती संभाजी महाराज यांचे बलिदान व्यर्थ जाऊ देता कमा नये. संभाजी महाराजांना हाल-अपेष्टा सहन करत मरणाला प्रवृत्त करणारा तोच इस्लाम धर्म, मुस्लिम समाज आज हिंदुस्थानचा खरा शत्रू आहे. त्यामुळे आपल्याला सावध राहण्याची गरज आहे. संभाजी महाराजांच्या बलीदानाचा सूड घेण्याची तसेच जसेच्या तसे उत्तर देण्याची ताकद प्रत्येक हिंदू दाखवेल, असा एक दिवस नक्की उगवेल. हीच खऱ्या अर्थाने हिंदुस्थानातील हिंदुची छत्रपती संभाजी महाराजांना श्रद्धांजली असेल.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

नागपूर येथे डॉक्टरने विकले नवजात बाळ!