Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अन्नदात्याला देशद्रोही आणि अतिरेकी ठरवणं आपल्या संस्कृतीत बसत नाही

अन्नदात्याला देशद्रोही आणि अतिरेकी ठरवणं आपल्या संस्कृतीत बसत नाही
, सोमवार, 14 डिसेंबर 2020 (10:07 IST)
देशातील अन्नदात्याला देशद्रोही आणि अतिरेकी ठरवणं आपल्या संस्कृतीत बसत नाही... असं वक्तव्य करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर हल्लाबोल केला. दोन दिवसीय हिवाळा अधिवेशन आज सुरू होत आहे. याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. 
 
सध्या देशात शेतकरी आंदोलनावरून राजकारण तापलं आहे. दिल्लीत शेतकऱ्यांच्या आंदोलनावरूनही ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टीका केली. देशातील अन्नदात्याला देशद्रोही आणि अतिरेकी ठरवणं आपल्या संस्कृतीत बसत नाही. असं ते म्हणाले. 
 
शिवाय शेतकऱ्यांच्या हक्कांबद्दल कोणी आवाज उठवला तर ते देशद्रोही. विरोधात बोललं आणि तुरुंगात टाकणं ही आणीबाणी नाही का? असा प्रश्न यावेळी मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केला. 
 
तुम्हीच कांदा पाकिस्तानातून आयात करता आणि आता शेतकरी देखील पाकिस्तानातून आणता का? असा म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर हल्लाबोल केला. 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मराठा आरक्षणासाठी आंदोलनकर्ते आज मुंबईला धडक देणार, आझाद मैदानात ठिय्या आंदोलन