Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

दसर्‍याला झेंडूच्या फुलांचे महत्त्व का ?

दसर्‍याला झेंडूच्या फुलांचे महत्त्व का ?
, गुरूवार, 22 ऑक्टोबर 2020 (17:24 IST)
दसरा विजयचा प्रतीक आहे. या‍ दिवसात वातावरणात आनंद पसरला असतो. झाडांवर फुलं बहरु लागतात. झेंडूचे फुलं जणू हसू लागतात. अशात या सणात झेंडूचे फुलं घरोघरी सजावटीसाठी, पूजेसाठी कामास घेतले जातात. देव पूजा, शस्त्र पूजा, आयुध पूजा तसेच वापरातील यंत्र, वाहनं व प्रवेशद्वारावर सजावटीसाठी झेंडूचा वापर होतो. का खास आहे झेंडू- प्रश्न हाच आहे की या सणावर झेंडूच्या फुलांना इतकं महत्त्व का? 
 
खरं तर यामागील कारण म्हणजे झेंडू सोप्यारीत्या उपलब्ध असणे आहे. आपल्या पिवळ्या आणि केशरी रंगामुळे हे फुलं खास आहेत. या रंगामुळे ते सोनेरी असल्याचे जाणवतं आणि तसेही पिवळा, केशरी किंवा सोनेरी रंग शुभ मानले गेले आहे. झेंडूच्या फुलांचा रंग विजय, हर्ष आणि उत्साहाचे प्रतिनिधित्व करतं. 
 
या फुलाचं धार्मिक महत्व इतर फुलांपेक्षा अधिक आहे म्हणून विजयाच्या सणावर झेंडूच्या फुलांची सजावट आणि पूजेसाठी हे फुलं वापरण्याचं महत्त्व आहे.
 
या फुलाला हिरण्यगर्भ पुष्प देखील म्हणतात. हिरण्य म्हणजे सोनं आणि त्याच्या रंगासारखे फुल म्हणजे झेंडू.
 
झेंडूची फुले इतर फुलांच्या तुलनेत जास्त काळ टिकतात. साधरण दोन ते तीन दिवसही फुले कोमेजत नाही.
 
एकाच रंगामध्ये विविध छटा, लहान-मोठे, टोकदार-पसरट पाकळ्यांचे आकार आकर्षण वाढवतात.
 
मेरीगोल्ड नावाचं हे फुलं सूर्याचे प्रतीक असल्याचे म्हटलं जातं. प्राचीन ग्रंथाप्रमाणे हे फुल सुंदरता आणि ऊर्जेचं प्रतीक आहे.
 
याला संस्कृतमध्ये स्थूल पुष्प या नावाने ओळखतात. हे दिव्य शक्तींसह सत्याचे प्रतीक मानले गेले आहे. 
 
पिवळा रंग देवाप्रती समर्पणाचे प्रतीक आहे. याच्या सुंगधाने नकारात्मक शक्ती दूर होऊन ताण कमी होण्यास मदत होते. 

हे वातावरणाला शांती प्रदान करणारा फुल आहे. 
 
आरोग्यासाठी फायदेशीर-  
तोंडाचे आरोग्य, जखमेवर तसेच त्वचा रोगापासून आराम मिळतो. मूत्रविकारात देखील झेंडूच्या औषधी गुणधर्मांचा फायदा होतो. दमा, श्वसनाच्या आजारांवर देखील झेंडू उपयुक्त आहे. 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

नवरात्र विशेष : या 13 उपायाने देवी आईला प्रसन्न करा