Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बारामतीत शरद पवारांचा पराभव होणे शक्यच नाही : जयंत पाटील

jayant patil
, बुधवार, 7 सप्टेंबर 2022 (21:32 IST)
राज्यात लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने बारामतीसह अन्य लोकसभा मतदारसंघावर लक्ष्य केंद्रीत केलेआहे. केंद्रीय नेते त्या त्या मतदारसंघात जाऊन आढावा घेत आहेत. यावर राष्ट्रवादीकडून पलटवार करण्यात आला असून, एखाद्या वेळेस सूर्य पश्चिमेला उगवेल, पण बारामतीत शरद पवारांचा पराभव होणे शक्यच नाही, असा विश्वास व्यक्त केला आहे.
 
एखाद्या वेळी सूर्य पश्चिमेला उगवेल. मात्र शरद पवारांची साथ बारामतीकर कधी सोडणार नाहीत. बारामतीमध्ये शरद पवारांचा पराभव बारामतीकर होऊ देणार नाहीत, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केला. आतापर्यंत अनेकांनी बारामतीला टार्गेट केले, येथे खोदून पाहिले, पण पाणी काही लागले नाही, असा टोला जयंत पाटील यांनी भाजपला लगावला.
 
भाजपचे हे प्रचार तंत्र आहे
भाजपचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपचे यंदा 'मिशन महाराष्ट्र' बरोबर 'मिशन बारामती' असल्याचे विधान करत शरद पवार टार्गेट असल्याचे स्पष्ट केले होते. यापूर्वी अनेकांनी बारामती टार्गेट करून खोदून पाहिले, पण कोणाला पाणी लागले नाही. त्यामुळे हा प्रयत्न आजचा नाही. भाजपचे हे प्रचार तंत्र आहे, असे जयंत पाटील यांनी सांगितले. सर्वोच्च न्यायालयाने शिवसेना आणि शिंदे गटाच्या याचिकांवरील सुनावणी २७ सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलल्याबद्दल जयंत पाटील यांनी नाराजी व्यक्त केली.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

भिवंडी :९ वर्षीय चिमुरड्याचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना