Publish Date: Fri, 05 Feb 2021 (07:13 IST)
Updated Date: Fri, 05 Feb 2021 (07:39 IST)
आदित्य ठाकरेंनी केलेल्या वक्तव्यावरून मनसे सरचिटणीस किर्तीकुमार शिंदे यांनी ट्वीटरवरून सुनावलं आहे. औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर करू यात शिवसेनेने ३० वर्षं घालवली…याला म्हणतात, टाईमपास! मुंबईकरांना चांगले रस्ते, बगीचे, शाळा देऊ असं आश्वासन शिवसेना प्रत्येक महापालिका निवडणुकीत देते… याला म्हणतात, टाईमपास! किंबहुना, करोना संकटकाळात लोकांना प्रत्यक्ष मदत करायचं सोडून मुख्यमंत्री उठता- बसता फेसबुक लाईव्ह करत होते… याला म्हणतात, टाईमपास! असं किर्तीकुमार शिंदे या ट्वीटमध्ये म्हणाले आहेत.