Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आयटीआय सहसंचालक जाधवला 5 लाखांची लाच घेताना पकडले, घरातून 1.61 कोटींची मालमत्ता जप्त

आयटीआय सहसंचालक जाधवला 5 लाखांची लाच घेताना पकडले, घरातून 1.61 कोटींची मालमत्ता जप्त
, गुरूवार, 6 जानेवारी 2022 (15:10 IST)
नाशिकचे व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण सहसंचालक अनिल मदन जाधव यांना तब्बल ५ लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. मुंबईच्या एसबी पथकाने ही कारवाई केली आहे. दरम्यान, जाधव यांच्या मुंबईतील राहत्या घरी एसीबीच्या पथकाने छापा टाकला असता त्यात सुमारे १ कोटी ६१ लाखांची मालमत्ता हस्तगत करण्यात आली.
 
या प्रकरणात तक्रारदारानुसार, तक्रारदार हे टेंडर स्किल इंटरनॅशनल कॉस्मेटोलॉजी अॅकॅडमीमध्ये भागीदार असून त्यांनी महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास मंडळ येथे अॅकॅडमी व त्याअंतर्गत कोर्सच्या मंजुरीसाठी व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण सहसंचालक कार्यालयात अर्ज सादर केला होता. सहसंचालक जाधव याने अर्जात अनेक त्रुटी काढल्या. तक्रारदाराने संपूर्ण कागदपत्रे नव्याने सादर केली. अंतिम मंजुरीच्या मोबदल्यात जाधव याने तक्रारदाराकडे साडेपाच लाखांची मागणी केली. तक्रारदाराने एसीबीकडे ७ डिसेंबर २०२१ रोजी तक्रार केली.
औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या (Industrial Training Institute Mumbai)) सहसंचालकांस पाच लाखांची लाच घेताना अटक करण्यात आल्यामुळे खळबळ उडाली आहे. नाशिकमध्ये येऊन मुंबईच्या पथकाने कारवाई केल्यामुळे या घटनेची मोठी चर्चा होत आहे....(ACB arrested anil jadhav in bribe case)
 
विशेष म्हणजे त्यांच्या घरात घेतलेल्या झाडाझडतीत दीड कोटींपेक्षा अधिक मालमत्ता आढळून आली असल्याचे समजते. संस्था मुंबई असल्याची प्राथमिक माहिती आहे.
 
अभ्यासक्रमाच्या म्हणजेच कोर्सेसच्या मंजुरीसाठी तक्रारदारांनी व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण विभागात अर्ज केला होता. या अर्जामध्ये अनेक अनेक त्रुटी या सहसंचालकांनी काढल्याचा आरोप करण्यात आला आहे.
 
लाचेची रक्कम मोठी असल्यामुळे ही कारवाई सहसंचालकांच्या घरापर्यंत पोहोचली. संशयित सहसंचालकांची नाशिकमध्ये मोठी मालमत्ता असल्याचे समजले. यानंतर लाचलुचपत विभागाने नाशिकमध्ये कारवाई केली असता मोठे घबाड त्यांच्या हाती लागले आहे.
 
पडताळणीत १४ डिसेंबरला आरोपीने लाच मागितल्याचे स्पष्ट झाले. मंगळवारी सापळा रचून जाधव याला लाचेची रक्कम घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. खेरवाडी, वांद्रे येथील शासकीय तंत्र निकेतन परिसरातील कार्यालयात हा सापळा यशस्वी झाला. राज्याच्या व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण विभागाच्या प्रभारी संचालकपदाचा पदभार सहसंचालक अनिल जाधव यांच्याकडे सोपवण्यात आला होता.
 
छाप्यात सापडले हे घबाड
घराच्या झडतीत ७९ लाख ४६ हजार ७४५ रुपये किमतीचे एक किलो ५७२ ग्रॅम सोन्याची नाणी, बिस्किटे व दागिने सापडले. ७९ लाख ६३ हजार ५०० एवढी बेहिशेबी रोख रक्कम मिळून आली. कार्यालय झडतीत २ लाख २८ हजार बेहिशेबी रोख रक्कम अशा एकूण १ कोटी ६१ लाख ३८ हजार रुपयांच्या मौल्यवान वस्तू व रोख रक्कम ताब्यात घेण्यात आली. सहाय्यक पोलिस आयुक्त आबासाहेब पाटील, निरीक्षक सुप्रिया नटे, सहाय्यक पोलिस आयुक्त प्रवीण लोखंडे, पोलिस निरीक्षक गायत्री जाधव यांनी अपर पोलिस आयुक्त लखमी यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई केली.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मराठी पत्रकारितेत बाणेदारपणा जोपासण्याचे सामर्थ्य – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे