Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

जळगाव: कारच्या धडकेत मुलाचा दुर्देवी मृत्यू

death
, सोमवार, 29 ऑगस्ट 2022 (09:35 IST)
जळगावात दोन कार मध्ये लागलेली शर्यतीमुळे एका 11 वर्षाच्या निष्पाप मुलाला आपला जीव गमवावा लागण्याची दुर्देवी आणि धक्कादायक घटना घडली आहे.विक्रांत मिश्रा असे या मुलाचे नाव आहे. जळगाव शहरात मेहरूण तलाव परिसरात ही  घटना रविवारी घडली. या परिसरात असलेल्या ट्रॅक वर दोन कार मध्ये शर्यत लागली होती. मयत विक्रांत हा त्या परिसरात सायकल चालवत असताना एका इनोव्हा कारने एका दुसऱ्या कारला  ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करताना भरधाव वेगाने जाणाऱ्या कारच्या समोर अचानक विक्रांत आला. कार चालवणाऱ्या तरुणाचं कारवरील नियंत्रण सुटलं आणि त्यात ब्रेक दाबण्याऐवजी एक्सलेटर दाबलं गेल्याने कारचा वेग आहे त्यापेक्षा दुप्पट झाला. परिणामी कारची जबर धडक विक्रांत मिश्रा असलेल्या सायकलीला लागली. धडक एवढी भीषण होती की यावेळी विक्रांत सायकलीसह दहा फूट उंच फेकला गेला आणि रस्त्यावर आदळला. यात जबर दुखापत झाल्याने विक्रांतचा जागीच मृत्यू झाला. 

अपघातात विक्रांत गंभीर झाला असल्याचं लक्षात येताच गाडीतील तिघा तरुणांनी त्याला तातडीने दवाखान्यात नेऊन उपचार करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यापूर्वी विक्रांतने जगाचा निरोप घेतला होता. विक्रांत हा मिश्रा कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता. त्याचे वडील संतोष मिश्रा हे जळगाव साऊंड असोसिएशन संघटनेचे सहसचिव म्हणून काम करतात. तर त्यांचा डीजे रिपेअरिंगचा व्यवसाय आहे.या प्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे. 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पाकिस्तानात पुराचा हाहाकार सुरूच, मृतांचा आकडा १००० च्या पुढे