Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

जळगाव :अनैतिक संबंधातून सासर्‍याचा प्रियकराच्या मदतीने खून

murder
, सोमवार, 27 मार्च 2023 (08:12 IST)
अनैतिक संबंधात सासर्‍याचा वारंवार अडथळा येत असल्याने सुनेने प्रियकराच्या मदतीने सासर्‍याचा खून केल्याची घटना किनगाव येथे उघडकीस आली आहे.
 
याप्रकरणी जळगाव गुन्हे शाखेने आरोपी प्रियकरासह किनगावातील सुनेला बेड्या ठोकल्या आहेत. जावेद शाह अली शाह फकीर (वय32, प्रतिभा नगर, वरणगाव, ह.मु.उदळी, ता.रावेर) आणि मीनाबाई विनोद सोनवणे (वय 30, किनगाव) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. विनोद सोनवणे असे या महिलेच्या पतीचे नाव आहे. त्याच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी ही कारवाई करत खुनाचा उलगडा केला.
 
किनगाव येथील 58 वर्षीय व्यक्तीच्या खून प्रकरणी उदळी (ता. रावेर) येथील 28 वर्षीय तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. मृत व्यक्तीच्या सुनेने तिच्या प्रियकराच्या मदतीने हे कृत्य केले. प्रियकर वारंवार किनगाव येथे यायचा. तेव्हा तो येथे का येतो? याचा जाब मृत भीमराव सोनवणे यांनी विचारला होता. त्याचा त्याला सतत राग यायचा. यातुन ही खुनाची घडला घडली असून,  संशयितास पोलिसांनी भुसावळ येथून रात्री ताब्यात घेतले व त्याने खून केल्याची कबुली दिली आहे.
 
उदळी, ता. रावेर येथील जावेद शाह अली शाह फकीर या तरुणाने पोलिसांकडे दिलेल्या कबुलीनुसार, किनगाव ता. यावल येथील भीमराव सोनवणे (वय 58) यांची सून मीना विनोद सोनवणे हिच्या बहिणीचे रावेर तालुक्यातील उदळी येथे सासर आहे आणि मीना ही विवाहापुर्वी उदळी येथे जायची. तेथे तिची ओळख जावेद शहा अली शाह फकीर सोबत झाली होती. या ओळखीतून दोघांमध्ये जवळीक आणि दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. विवाहानंतर जावेद शाह हा किनगाव येथे येणे-जाणे वाढू लागले. दरम्यान, त्याचे सततचे घरात येणे भीमराव सोनवणे यांना खटकत होते.
 
जावेद शहा हा तीन दिवसांपूर्वी किनगाव भीमराव यांच्या सुनेला भेटण्यासाठी आला होता. तेव्हा सुनेने सासर्‍याचा काटा काढण्याचे ठरवले. त्यानुसार सुनेचा प्रियकर जावेद हा आपल्या दुचाकीवर भीमराव सोनवणेे यांना यावल गावात घेऊन गेला. तेथे दो घा जणांनी भरपूर दारू प्यायली आणि रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घराच्या दिशेने निघाले असता त्यांची दुचाकी चुंचाळे जवळील पुलावर आली असता त्यांच्यात कडाक्याचे भांडण झाले. त्यानंतर हा वाद विकोपाला गेला. जावेद शाह याने भीमराव सोनवणे यांच्यावर चाकूचे वार करून त्यांची हत्या केली, असे त्याने पोलिसांना दिलेल्या जबाबत सांगितले.
 
विवाहितेच्या कौटुंबिक पार्श्‍वभूमीची माहिती घेऊन पोलिसांचा आरोपीवर संशय बळावला होता. त्यानंतर त्याचा शोध घेत असताना तो भुसावळ येथील रिदम हॉस्पिटलजवळ मिळून आला आणि तिथून त्याला अटक करण्यात आली. या गुन्ह्यामध्ये अजून कोणाचा सहभाग आहे का, याचा शोध पोलीस घेत आहेत.
 
याप्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सुनील मोरे करीत आहेत.

Edited By - Ratnadeep ranshoor 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

WPL : मुंबई इंडियन्सने दिल्लीचा पराभव करत महिला प्रीमियर लीगचे विजेतेपद पटकावले