भारत आणि पाकिस्तान सीमेवर काही दिवसांपासून तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्य आणि मुंबईत हाय-अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. राज्याच्या विधिमंडळाचे अधिवेशन मुंबईत सुरू आहे. त्यामुळे विधिमंडळ परिसरात मोठ्या संख्येने पोलिस बंदोबस्त ठेवावा लागला आहे. पोलिसांवर पडणारा हा ताण लक्षात घेता आधिवेशन तहकूब करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि त्या निर्णयास सर्वच पक्षांनी पाठिंबा दिला, असे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विधानसभेत नमूद केले. पाकिस्तानाने ताब्यात घेतलेल्या अभिनंदन वर्थमान या हवाईदलाच्या पायलटला सुखरूप मायदेशी आणण्याचे प्रयत्न करण्याची मागणीही त्यांनी केली.