rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पुणे येथील प्रसिद्ध झेड ब्रिजचा एक भाग कोसळला

kakasaheb gadgil
पुणे शहरातील डेक्कन भागाजवळील प्रसिद्ध झेड ब्रिजचा कठडा कोसळला आहे. या ठिकाणी  मेट्रोचे काम सुरु असताना एका ट्रकचा धक्का लागून हा  कोसळल्याची दुर्घटना  मध्यरात्री घडली आहे.

मात्सुर दैवाने यात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली  नाही.  झेड ब्रिजजवळ मेट्रोचे काम जोरात सुरु आहे . त्या कामातच एक ट्रक रात्री ब्रिजच्या कठड्याला धडकला त्यामुळे  हा अपघात घडला. मात्र घटनेची माहिती मिळताच नागरिकांमध्ये पावसामुळेच पूल कोसळला अशी जोरदार चर्चा पसरली होई.

मागील काही दिवसात पावसामुळे भिंत कोसळण्याच्या घटना घडल्यामुळे  शहरात लोकांमध्ये  भीतीचे वातावरण असून, ही घटना घडल्यानंतर त्याच घटनांची पुनरावृत्ती डेक्कन जवळील झेड ब्रिज अपघातात झाल्याची शक्यता वर्तवण्यात आली. नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार हा अपघात मेट्रोच्याच एका ट्रकच्या धडकेमुळे घडला आहे,

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

महाराष्ट्र राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी रुपाली चाकणकर