22 जानेवारी रोजी अयोध्येत प्रभू श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राम लल्लाची पूजा करण्याचा मान नवी मुंबईतील कांबळे दाम्पत्याला मिळाला आहे. विठ्ठल कांबळे आणि उज्वला कांबळे अशी त्यांची नावे आहेत. देशभरातील 11 जोडप्यांना ही संधी मिळाली असून यामध्ये कांबळे दाम्पत्य देखील आहेत.
अयोध्येतील राम मंदिर लोकार्पण सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आहे. या सोहळ्यासाठी मंदिराच्या न्यास समितीने जोरदार तयारी केली आहे. या सोहळ्यासाठी देशासहित जगभरातून मंडळी हजेरी लावणार आहेत. या राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याला उपस्थित राहण्याचा मान देशातील ११ दाम्पत्यांना मिळाला आहे. त्यात नवी मुंबईतील कांबळे दाम्पत्याचा सामावेश आहे.
Edited By - Ratnadeep ranshoor