Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कसबा पोटनिवडणूक, रवींद्र धंगेकर कसबा गणपतीसमोर उपोषण करणार कारण

ravindra dhingekar
, शनिवार, 25 फेब्रुवारी 2023 (08:18 IST)
Twitter
कसबा पोटनिवडणुकीतले महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर हे आज (25 फेब्रुवारी) गणपती मंदिरासमोर उपोषणाला बसणार असल्याची माहिती आहे. विरोधी उमेदवाराकडून पैसे वाटप होत असल्याचं धंगेकरांचं म्हणणं आहे. त्यामुळेच ते उपोषण करणार असल्याचं 'सकाळ'ने आपल्या बातमीत म्हटलं आहे.
 
पोलिसांच्या उपस्थितीत भाजप नेते, पदाधिकारी हे लोकांना पैसे वाटत असल्याचा आरोप धंगेकर यांनी केला असून ही लोकशाहीची हत्या असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
 
धंगेकर हे परभवच्या उंबरठ्यावर आहेत आणि त्यांनी केलेला आरोप हा हास्यास्पद आणि निषेधार्य आहेत. पोलिसांचे नाव घेऊन पैसे वाटण्याचा काम सुरू आहे, हे सांगणे म्हणजे सहानभुती मिळवण्याचा प्रकार आहे, असं भाजपचे प्रवक्ते संदीप खर्डेकर यांनी म्हटलं आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

फक्त व्यवसायाचा विचार केला असता तर मी मस्कपेक्षा श्रीमंत असतो