घरात लहान बाळ असलं की सर्व हौस पूर्ण केल्या जातात, घरात बाळाच्या जन्मानंतर त्याला दागिने घातले जातात. तीन महिन्याच्या बाळाच्या बोटात सोन्याची अंगठी घातली होती.बाळांची सवय असते स्वतःचे बोट चोखायची. बोट चोखत त्याने बोटातली अंगठी गिळली. ती अंगठी बाळाच्या पोटात गेल्याच बाळाच्या आईला कळल्यावर बाळाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुदैवाने बाळाच्या अन्न नलिकेत अडकली नव्हती.अंगठी बाळाच्या जठरामध्ये अडकल्याचे एक्सरेत दिसत होते. डॉक्टरांनी एंडोस्कोपीने अंगठी काढण्यात येईल असे सांगितले.
एन्डोस्कोपी करण्याआधी बाळाला भूल देणं गरजेचं होते. त्याला भूलतज्ज्ञ ने भूल दिली आणि नंतर बाळाला आईने दूध पाजल्याचे कळल्यावर अंगठी काढता येणं शक्य नव्हते.रात्री उशिरा एन्डोस्कोपी करून यशस्वीपणे जठरामधील अंगठी काढण्यात यश आले. सुदैवाने बाळाच्या आईला अंगठी पोट्यात गेल्याचे लवकर लक्षात आले. नाहीतर बाळाचे जठर नाजूक असल्याने ते फाटण्याची शक्यता होती.पण सुदैवाने यशस्वीपणे अंगठी बाळाच्या पोटातून बाहेर काढण्यात आली. .