Publish Date: Fri, 11 Aug 2023 (16:09 IST)
Updated Date: Fri, 11 Aug 2023 (16:12 IST)
Sataraa accident : काळ कधी आणि कुठे घात करेल हे कोणीही सांगू शकत नाही. देव दर्शनाला जाताना काळाने झडप घालून झालेल्या अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झाला तर चार प्रवाशी गंभीर जखमी झाल्याची घटना साताऱ्या जिल्ह्यात धोंडेवाडी खटाव तालुक्यातील सूर्याचीवाडी येथे गुरुवारी सकाळी झाली आहे. सूर्यवाडी येथे सकाळी सहा वाजेच्या सुमारास आठ जणांना घेऊन निघालेली चारचाकी गाडी झाडावर जाऊन आदळली आणि गाडीचा चक्काचूर झाला. या अपघातात एक पुरुष आणि तीन महिला जागीच ठार झाल्या तर एका महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, लाकरेवाडी येथे बाळुमामाच्या मेंढरांच्या देवस्थानाचे दर्शन घेण्यासाठी ओमनी वाहनातून आठ जण निघाले होते. दही वडी मायणी रस्त्यावर सूर्याचीवाडी येथे सकाळी सहा वाजेच्या सुमारास गाडीवरील नियंत्रण सुटून झाडावर गाडी आदळून अपघात झाला या अपघातात 4 जण ठार झाले. अपघाताची माहिती मिळतातच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून जखमींना स्थानिकांच्या मदतीने रुग्णालयात पाठविले. पोलीस प्रकरणाचा तपास करत आहे.