Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Tuesday, 15 April 2025
webdunia

गुप्तधनासाठी चिमुकलीचे अपहरण

kid
पिंपरी , सोमवार, 25 जुलै 2022 (16:09 IST)
जुन्नर येथील चौघुले दाम्पत्याने पैशांसाठी 4 वर्षीय मुलीची अपहरण केल्याची घटना समोर आली आहे. या मुलीचा नरबळी दिल्यास आपण मालामाल होऊ, या हव्यासातून सदर दाम्पत्याने हा कट रचला. हा नरबळी देण्यासाठी चार वर्षांच्या मुलीची आवश्यकता होती. त्यानुसार चिखली येथे राहणाऱ्या विमल चौघुले यांची बहीण सुनीता नलावडे हिला याबाबत कल्पनाही दिली होती. त्यानुसार अशी एक मुलगी असल्याचे तिने विमलला सांगितले आणि त्यानंतर आरोपींनी कट रचून चिमुकलीचे अपहरण केले.
 
दरम्यान, आपली मुलगी बराच वेळ झाला तरी घरी येईना म्हणून आईने पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत या अपहरणकर्त्या बंटी-बबलीला जुन्नर येथून मुलीसह ताब्यात घेतले. अवघ्या10  तासात पिंपरी चिंचवड पोलिसांनी ही कामगिरी केल्याने त्यांचे कौतुक करण्यात येत आहे. याप्रकरणातील आरोपी चौघुले आणि नलवडे कुटुंबातील चौघांना अटक करण्यात आली असून इतर दोन अल्पवयीन मुलांनाही ताब्यात घेण्यात आले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आम्ही पार्टी सोडलेली नाही, पार्टीच्या अंतर्गत हा उठाव केलेला आहे: गुलाबराव पाटील