Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Thursday, 1 May 2025
webdunia

सह्याद्री फार्म्सला किर्लोस्कर वसुंधरा सन्मान; फिल्म फेस्टिवलला दिमाखात सुरुवात

Kirloskar Vasundhara Honor to Sahyadri Farms; Film festival begins in Dimakha
, गुरूवार, 25 जानेवारी 2024 (08:59 IST)
''सकस अन्न, समृद्ध निसर्ग आणि आरोग्यपूर्ण समाज’ : किर्लोस्कर वसुंधरा फिल्म फेस्टिवलचे उदघाटन
 
किर्लोस्कर उद्योग समूहातर्फे होणारा दोनदिवसीय किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलला बुधवार (दि. २४) पासून सुरुवात झाली. डॉ. मुंजे इन्स्टिट्यूटच्या ऑडिटरियम मध्ये झालेल्या उदघाटन कार्यक्रमात नाशिकच्या सह्याद्री फार्म्सला किर्लोस्कर वसुंधरा सन्मान देऊन गौरविण्यात आले. कंपनीचे मुख्य क्रायकारी अधिकारी सचिन वाळुंज यांनी तो स्वीकारला. “किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ५० लघुपट दाखवण्यात येणार आहे. या वर्षीचा हा १३ वा महोत्सव आहे.
 
''सकस अन्न, समृद्ध निसर्ग आणि आरोग्यपूर्ण समाज’ या विषयाशी संबंधित हा महोत्सव असून सेंट्रल हिंदू मिलिटरी एड्युकेशन संस्थेचे सेक्रेटरी मिलिंद वैद्य, किर्लोस्कर ऑइल इंजिन्सचे नाशिक प्लांट हेड परेश कुमार जोशी, फॅक्टरी मॅनेजर राहुल बोरसे, फायनान्सचे राहुल कासार, वसुंधरा फेस्टिवल प्रमुख वीरेंद्र चित्राव, सुवर्णा बांबुळकर, डॉ. मूंजे इन्स्टिट्यूटच्या प्राचार्या पी. एम. कुलकर्णी, प्राध्यापिका शीतल गुजराथी यांच्या हस्ते उदघाटन झाले.
 
ऑफलाईन पद्धतीने होणार हा या वर्षीचा नाशिकमधील पहिला उत्सव असून गुरुवार दि. २५ रोजी दुपारी ११ वाजता मविप्र आयएआरटी महाविद्यालयाच्या सेमिनार हॉलमध्ये किर्लोस्कर वसुंधरा मित्र पुरस्कार वितरण होईल. वैयक्तिक वसुंधरा मित्र पुरस्कार नाशिक मधील नंदिनी नदीच्या स्वच्छतेसाठी प्रयत्न करणारे खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन कि बात कार्यक्रमात दखल घेतलेले चंद्रकिशोर पाटील तर संस्थात्मक पुरस्कार प्रसिद्ध पर्यावरणप्रेमी ट्रीमॅन अशी ओळख असलेले शेखर गायकवाड यांच्या नेतृत्वातील आपले पर्यावरण या संस्थेला देण्यात येणार आहे.
 
उदघाट्नाच्या कार्यक्रमात बोलताना मिलिंद वैद्य यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. वेळीच पर्यावरण रक्षण केले नाही तर पुढील काळ कठीण आहे. ऍग्रो प्रोड्युस कंपनी स्थापन करत सह्याद्री फार्मने आदर्श घालून दिला आहे. भरड धान्यालाओळख प्राप्त झाली आहे. वसुंधरा महोत्सवाच्या कार्यक्रम महत्वाचा असलेल्या इको रेंजर्स प्रकल्पात संस्थेकडून जास्तीतजास्त विद्यार्थी सहभागी होतील याची हमी त्यांनी दिली. तर चित्राव म्हणाले कि कोरोनाने आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकवल्या आहेत. त्यात अनुषंगाने भारतातील तृणधान्ये अर्थात भरड धान्यांबद्दल जगभरात चर्चा झाली. संयुक्त राष्ट्रांनी २०२३ हे वर्ष इयर ऑफ मिलेट्स जाहीर केले. त्याने शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. तरुणाईने फास्टफूडच्या आहारी न जाता सकस अन्न घ्यावे. त्याने सामाजिक आरोग्य जपावे. पर्यावरण समृद्ध कसे राहील याकडे लक्ष द्यावे. या तीनही बाबी एकमेकांशी संबंधित असून याच विषयावर पुढील पाच वर्षे किर्लोस्कर वसुंधरा फेस्टिवल दरम्यान प्रयत्न केले जाणार आहेत. यावर्षी ३०हुन अधिक शहरांमध्ये हा उत्सव ऑफलाईन पद्धतीने होणार आहे.
 
मविप्र समाजकार्य विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी फेस्टिवलच्या विषयांना धरून मनोरंजक पद्धतीने व तरुणांना समजेल अश्या भाषेत पथनाट्य सादर करत जागृतीचे काम केले. पर्यावरणपूरक वस्तूंचा इको बझारआंतरराष्ट्रीय मिलेट्स वर्षानिमित्त फेस्टिवल दरम्यान तृणधान्ये आणि पर्यावरणपूरक वस्तूंचा इको बझारही कार्यक्रम स्थळी भरविण्यात आला आहे. महोत्सव यशस्वी होण्यासाठी किर्लोस्कर ऑइल इंजिन्सचे प्रवीण बोडके , प्रसाद झेंडे, गिरीश वडनेरे आदी परिश्रम घेत आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

३ रा देवगिरी शॉर्ट फिल्म फेस्टिवल