Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

राजधानी मुंबईच्या मनपाच्या महापौर किशोरी पेडणेकर

राजधानी मुंबईच्या मनपाच्या महापौर किशोरी पेडणेकर
मुंबईच्या महापौरपदासाठी शिवसेनेकडून किशोरी पेडणेकर यांचे नाव निश्चित झाले आहे. उपमहापौरपदासाठी सुहास वाडकर यांचे नाव घोषित करण्यात आलं आहे. मावळते महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी ही घोषणा केली असून, पेडणेकर यांनी सोमवारी (18 नोव्हेंबर) शिवसेनेकडून महापौरपदासाठी मुंबई महापालिकेत अर्ज दाखल केला. शिवसेनेची एकहाती मनपात सत्ता असल्याने ही निवड पूर्ण झाली असून, फक्त २२ तारखेला औपचारिक घोषणा महोणे बाकी राहिले आहे.
 
“महापौरपदासाठी माझ्या नावावर शिक्कामोर्तब झाले याचा मला आनंद आहे. पण त्यासोबत कामाची जबाबदारीही आता वाढली आहे. तसेच, याचा आनंद साजरा करण्यापेक्षा मुंबईच्या समस्या सोडवणे हे मी माझे आद्यकर्तव्य समजून काम करेन,” अशी प्रतिक्रिया किशोरी पेडणेकर दिली आहे.
 
किशोरी पेडणेकर यांची माहिती  
किशोरी पेडणेकर या मुंबई महापालिकेच्या (191 G/S) वरळीतील गांधीनगर-डाऊन मिलमधील नगरसेविका 
दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण वरळीतील बाबासाहेब आंबेडकर हायस्कूल या शाळेत शिकल्या 
किशोरी पेडणेकर या शिवसेनेच्या ज्येष्ठ नगरसेविका 
वरळीला शिवसेनेचा गड बनवण्यात किशोरी पेडणेकर यांचा मोठा वाटा 
एकही मोठं पद नाही, नगरसेविका ते थेट महापौर, किशोरी पेडणेकरांचा प्रवास 
किशोरी पेडणेकर या सलग तीन वेळा नगरसेविका म्हणून निवडून आल्या 
रायगड, शिर्डी जिल्हा महिला संघटकही 
2013 मध्ये एका वर्षासाठी स्थापत्य शहर समितीच्या अध्यक्षा 
2017-18 वर्षीचा प्रजा फाऊंडेशनतर्फे सर्वोत्कृष्ट नगसेवक म्हणून पुरस्कार  
त्यांना पालिकेतील कामकाजाचा दांडगा अनुभव आहे. त्यांची नगरसेवक पदाची तिसरी टर्म सुरु आहे. यापूर्वी 2 वेळा जी साऊथ प्रभाग समिती अध्यक्षपद भूषवले आहे. यापूर्वी 2006 मध्ये त्या महिला-बालकल्याण समिती अध्यक्ष म्हणूनही काम पाहिले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याशी सरकार स्थापनेबाबत चर्चा झाली नाही