Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

'त्या' ट्वीटबाबत किशोरी पेडणेकर यांनी दिले स्पष्टीकरण

'त्या' ट्वीटबाबत किशोरी पेडणेकर यांनी दिले स्पष्टीकरण
, गुरूवार, 3 जून 2021 (16:29 IST)
मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर याना ट्वीटर युझरचा बाप काढणे महापौरांच्या अंगाशी आले आहे. यासंदर्भात महापौर किशोरी पेडणेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण दिले आहे. बाप काढल्याचे ते ट्वीट एका शिवसैनिकाकडून चुकून टाकले गेले. पण हे चुकीचे ट्वीट टाकणाऱ्या शिवसैनिकाची हकालपट्टी केली असल्याची माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली.
 
महापौर म्हणाल्या की, ‘काल बीकेसीमध्ये एक कार्यक्रम होता. माझ्यासोबत शाखाप्रमुख आणि काही शिवसेनेचे कार्यकर्ते होते. कधी कोणताही कार्यक्रम असेल तर मी माझ्याकडे मोबाईल ठेवत नाही. माझा मोबाईला कधी लॉक नसतो. आजूबाजूला असलेल्या कोणाकडेही मी मोबाईल देते. त्याप्रमाणे मी एका शिवसैनिकाकडे मोबाईल दिला. बसल्या बसल्या त्याने ते चाळले असावे. दरम्यान आक्षेपार्ह ट्वीट असतात याबाबत काही शंका नाही. पण रागाने शिवसैनिकांने ट्वीट केल्यानंतर माझ्या हातात आल्यावर मी चेक केले. माझ्या लक्षात आले की, शिवसैनिकाने ही मोठी चूक केली आहे आणि असे करू नये. कोणी कितीही वाईट असले तरी आपण तसे वागू नये. या मताशी मी आहे आणि तुम्ही ऐरव्ही माझे वर्तन पाहिले आहे. मी कधीही असे गैरवर्तन करत नाही. मी त्वरित ते ट्वीट डिलीट केलं.’

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पूल वाहून गेल्याने साताऱ्यातून मेढामार्गे महाबळेश्वरला जाणारा रस्ता बंद