Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नागपूरमध्ये व्हेंटिलेटरचा मोठा तुटवडा, अनेकांचे जीव धोक्यात

नागपूरमध्ये व्हेंटिलेटरचा मोठा तुटवडा, अनेकांचे जीव धोक्यात
, गुरूवार, 10 सप्टेंबर 2020 (17:40 IST)
नागपूर शहरात व्हेंटिलेटरचा मोठा तुटवडा निर्माण झालां आहे. कोरोना रुग्णांसाठी नागपुरात अवघे 291 व्हेंटिलेटर उपलब्ध आहेत. त्यामुळे व्हेंटिलेटर्ससाठी अनेक रुग्ण वेटिंग लिस्टवर आहेत. तर वेळेवर व्हेंटिलेटर न मिळाल्याने अनेकांना आपला जीवही गमावला लागला आहे.

नागपूर जिल्ह्यात सध्या 11 हजारच्या वर कोरोना रुग्ण आहेत, ज्यांच्यावर उपचार सुरु आहेत.  रोज 2000 च्या आसपास रुग्ण वाढत आहेत. पण संपूर्ण जिल्ह्यात कोव्हिड रुग्णांसाठी अवघे 291 व्हेंटिलेटर्स आहेत. सरकारी आणि खाजगी रुग्णालयात अवघे 291 व्हेंटिलेटर्स आहेत. अनेकांना वेळेवर व्हेंटिलेटर न मिळाल्याने जीव गमवावा लागला आहे. पण परिस्थिती सुधारण्याकडे प्रशासनाचं लक्ष दिसत नाही .

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

भारतीय वायुसेनेत राफेल यांच्या प्रवेशामुळे धोनी उत्साहित, ट्विटरवर आनंद व्यक्त केला