महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील गंगाखेड शहराजवळ एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. लातूर येथील मस्नाजी सुभाषराव तुडमे या 53 वर्षीय शिक्षकाने पत्नी रंजना आणि मुलगी अंजलीसह रेल्वेच्या रुळावर मालगाड़ी समोर उडी मारून आत्महत्या केली.
मस्नाजी हे गंगाखेड येथील एका सरकारी हायस्कूलमध्ये शिक्षक होते आणि सध्या नोकरीनिमित्त पत्नी व मुलीसह गंगाखेड येथे राहत होते. 28 नोव्हेंबर रोजी दुपारी 2.30 वाजेच्या सुमारास परळीकडे जाणाऱ्या कोळशाच्या मालगाडीसमोर तिघांनी हे पाऊल उचलल्याची घटना घडली.
पोलिसांनी सांगितले की, मृताची मुलगी अंजली हिचे गेल्या वर्षीच लग्न झाले होते मात्र दुर्दैवाने तिच्या पतीचा रस्ता अपघातात मृत्यू झाला होता. या घटनेमागचे खरे कारण सध्या स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. असून लातूर जिल्ह्यातील किणी कडु गावात अंत्यसंस्कार करण्यात आले. या आत्महत्या मागील पोलिस कारणांचा शोध लावत आहे.