Publish Date: Thu, 09 Dec 2021 (21:58 IST)
Updated Date: Thu, 09 Dec 2021 (22:00 IST)
विधान परिषद निवडणुकीसाठी काँग्रेसने ऐनवेळी आपला उमेदवार बदलला असून, आता छोटू भोयर यांच्या ऐवजी अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांनी पाठिंबा जाहीर केला आहे. विशेष म्हणजे काँग्रेसने तसं पत्रक देखील काढल आहे.
काँग्रेसकडून उमेदवार बदलला जाणार अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू होती. त्यानंतर काँग्रेसने आता प्रत्यक्ष तसा निर्णय घेतल्याचं समोर आलं आहे. तर, काँग्रेसकडून घेण्यात आलेल्या निर्णयानंतर छोटू भोयर यांची देखील प्रतिक्रिया समोर आली आहे.