Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

परळी वैद्यनाथ मंदिर समितीला आले धमकीचे पत्र

परळी वैद्यनाथ मंदिर समितीला आले धमकीचे पत्र
, शनिवार, 27 नोव्हेंबर 2021 (15:35 IST)
बीड जिल्ह्यातील परळी वैद्यनाथ मंदिर समितीला “वैद्यनाथ मंदिर संस्थानाकडे खूप पैसे आले आहेत. ५० लाख रुपये द्या अन्यथा RDXने मंदिर उडवून देवू”, अशा आशयाचं हे पत्र आले आहे. वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टचे सचिव राजेश देशमुख यांना हे पत्र प्राप्त झाले आहे. या पत्रानंतर परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या पत्रात लिहिलं आहे की, आपण फार मोठ्या मंदिर संस्थानाचे विश्वस्त आहात. आत्तापर्यंत आपल्या मंदिराला भरमसाठ रक्कम देणगी रुपाने मिळाली आहे. मी फार मोठा नामी गुंड, ड्रग माफिया व गावठी पिस्तुलधारक आहे. मला ५० लाख रुपयांची तातडीने गरज आहे. हे पत्र मिळताच दिलेल्या पत्त्यावर रक्कम पोच करावी, अन्यथा मी वैद्यनाथ मंदिर माझ्याकडच्या RDX ने उडवेन. 
परळी वैद्यनाथ हे देवस्थान बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक मानले जाते. या मंदिरात दर्शनासाठी देशभरातून भाविक येत असतात. कोविड प्रादुर्भावामुळे दीर्घकाळापासून बंद असलेलं हे मंदिर आता निर्बंध शिथिल झाल्याने खुलं करण्यात आलं आहे. त्यामुळे येथे भाविकांची गर्दी असते.  वैद्यनाथ मंदिर ट्रस्टचे सचिव राजेश देशमुख मंदिरात येऊन टपालाद्वारे आलेली पत्रे पाहत असताना त्यांना हे पत्र आढळले.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Indonesia Open: पीव्ही सिंधूने सिम युजिनचा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला, अंतिम फेरीत या दिग्गज खेळाडूशी स्पर्धा होईल