Publish Date: Fri, 02 Jun 2023 (08:13 IST)
Updated Date: Fri, 02 Jun 2023 (08:18 IST)
रत्नागिरी मागील ९ वर्षापासून सुरु असलेल्या व जिल्ह्यासह राज्यभर गाजलेल्या जाकादेवी सेंट्रल बँक दरोडा खटल्याचा निकाल लागला आहे. या प्रकरणी तीन आरोपींना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली असून तिघांची निर्दोष मुक्तता केली आहे. नोव्हेंबर २०१३ रोजी हि घटना घडली होती. या दरोड्यात बँकेतील ६ लाख रूपयांची रोकड लुटून नेल्याचा आरोप ६ संशयितांविरूद्ध ठेवण्यात आला होता. तसेच या दरोड्यात एकाचा मृत्यू तर एकजण गंभीर जखमी झाला होता.
Edited By- Ratnadeep Ranshoor