Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

हद्दच ! थेट स्मशानभूमिमध्ये दारूविक्री…

हद्दच ! थेट स्मशानभूमिमध्ये दारूविक्री…
, शनिवार, 17 एप्रिल 2021 (15:59 IST)
अहमदनगरच्या अकोले तालुक्यात कोव्हीड परिस्थितीवर नियंत्रण आणण्यास संचारबंदी सुरू आहे. या काळात अकोल्यातील सर्व देशी-विदेशी दारूची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश असताना विक्रेत्यांकडून स्मशानभूमितही अनधिकृतपणे दारू विकण्यात येत असल्याचे संतापजनक प्रकार समोर येत आहेत.
 
जादाभावाने चोरीछुपी मार्गाने दारूची विक्री सुरूच असल्याबची तक्रार अकोल्यातील शिक्षण तज्ञ व दारूबंदी अंदोलनाचे निमंत्रक हेरंब कुलकर्णी यांनी पोलिस निरीक्षक व दारूबंदी अधिकाऱ्यांकडे केली.
 
तक्रार करूनही संबंधित अधिकाऱ्यांकडून कारवाई संदर्भात सोईस्कर दुर्लक्ष केल्यामुळे कायदेशीर दारू दुकानातून दारूचे खोकेच्या खोके दुकानाबहेर काढून विकण्याचे काम सुरूच असल्याबद्दलची तक्रार हेरंब कुलकर्णी यांच्याकडून होत आहे.यासंदर्भात हेरंब कुलकर्णी म्हणाले, सरकारच्या आदेशानुसार सध्या कोविड परिस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी संचारबंदीत दारूची दुकाने बंद ठेवली आहेत. स्मशानभूमीतही दारू विक्री सुरू केली.
 
अकोल्यातील स्मशानभूमी ते उदासी आश्रम या परिसरात शेतात दारूचे खोके ठेऊन खुलेआम विक्री सुरू आहे. अनेक मद्यपी तिथे गर्दी करत आहेत, अशी तक्रार परिसरातील नागरिक करत आहेत. तेथे गांजा विक्रीही सुरू आहे. त्यामुळे या ठिकाणी दारूच्या बाटल्या कोणत्या दुकानाच्या स्टॉकमधील आहेत याची तपासणी करून संबंधित करून परवाना रद्द करावा. यापैकीच दुकानातून अगस्ती चित्रपटगृह परिसरातही एका घरातून विक्री होत आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पुणे शहराचे दोन लसीकरण महिन्यात पूर्ण होईल, महापौरांना विश्वास