येत्या 30 जानेवारीपासून राळेगणसिद्धीत बेमुदत उपोषण सुरू करण्याचा इशारा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिला आहे.
फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर लोकायुक्त कायदा करण्याबाबत वेळोवेळी चर्चा होऊन आश्वासने दिली, मात्र कायदा झाला नाही. 29 मार्च रोजी दिल्लीच्या रामलीला मैदानावर दुसर्यांदा उपोषण केले असता मुख्यमंत्री फडणविस यांनी स्वतः दिल्लीत येऊन आपले आंदोलन मागे घेण्यास भाग पाडले होते.
महाराष्ट्र राज्य लोकायुक्त कायदा केल्याचे आणि लोकपाल, लोकायुक्त कायद्याप्रमाणे नियुक्ती केल्याचे पहिले राज्य असावे, हेही मुख्यमंत्र्यांनी मान्य केले होते. आश्वासन देऊन नऊ महिन्यांचा कालावधी झाला असून, लोकपाल व लोकायुक्ताच्या नियुक्तीसाठी आपण येत्या 30 जानेवारीपासून नाईलाजास्तव राळेणसिद्धीत उपोषणास सुरूवात करीत असल्याचे हजारे यांनी पत्रात नमूद केले आहे.