वरळीतील बीडीडी चाळींमध्ये राहणाऱ्या पोलिसांना घरं देण्याची घोषणा करण्यात आली असली तरी प्रत्यक्षात त्यांना या घरांसाठी 50 लाख रुपये मोजावे लागणार आहेत. गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनीच यासंदर्भातील घोषणा केली आहे. या निर्णयामुळे एकीकडे पोलिस कुटुंबांमध्ये अस्वस्थता पसरलेली असतानाच, दुसरीकडे शिवसेनेसाठी देखील ही मोठी अडचण होऊन बसली आहे.
पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या वरळी विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक बीडीडी चाळी येत असल्याने या निर्णयाचा सर्वाधिक मोठा फटका त्यांना मतांच्या रूपाने बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता यामध्ये शिवसेना नेतृत्व नेमकी काय मध्यस्थी करणार याविषयी उत्सुकता आहे.