Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मास्तरचे विवाहित शिक्षिकेवर एकतर्फी प्रेम केला चाकू हल्ला

मास्तरचे विवाहित शिक्षिकेवर एकतर्फी प्रेम केला चाकू हल्ला
, गुरूवार, 20 जून 2019 (10:21 IST)
महाविद्यालयात तरुण तरुणी प्रेमात पडतात किंवा त्यांच्यात भांडणे होतात. मात्र या प्रकरणात चक्क एक सरच विवाहित शिक्षिकेवर एकतर्फी प्रेमात पडले त्यातून हा संतापजनक प्रकार घडला आहे. चाकूने जीवघेणा हल्ला केल्याचा प्रकार जळगावात घडला. त्यानंतर शिक्षकाने स्वत:वरही चाकूने वार केले. दोन्ही शिक्षकांना जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल केले आहे. दोन्ही शिक्षक बोदवड तालुक्यातील नाडगाव येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये काम करतात.
 
चंदा उमेश गडकळ (वय 32) या नाडगाव येथील आयटीआयच्या शिक्षिका असून, त्या मागील दीड वर्षांपासून शिकवत आहेत. याच महाविद्यालयात के. ई. पाटील हा शिक्षक म्हणून काम करतात. मागील काही महिन्यांपासून के. ई. पाटील हा चंदा गडकळ यांना व्हॉट्सअ‍ॅप आणि फेसबुकवर अतिशय अश्‍लील मॅसेज पाठवत होता. चंदा गडकळ यांनी या मॅसेजला कुठलाही प्रतिसाद दिला नाही. तर चंदा यांनी के. ई. पाटील महाविद्यालयाच्या वरिष्ठांकडे यासंदर्भात तक्रार केली होती. संचालक मंडळ आणि प्राचार्यांनी या गंभीर प्रकाराकडे सर्रास  दुर्लक्ष केल असे पती उमेश गडकळ यांनी दिली.
 
चंदा गडकळ यांनी वरिष्ठांकडे तक्रार केल्याने के. ई. पाटील संतापला होता, जेव्हा चंदा गडकळ यांना वर्गात एकटे पाहून के. ई. पाटील यांनी वर्गाचा दरवाजा बंद केला आणि नंतर त्याने चाकुने चंदा गडकळ यांच्यावर वार केले. के. ई. पाटील ने चंदा गडकळ यांच्या पोटावर, चेहऱ्यावर, हातावर वार करत त्यांना जखमी केलं. त्यानंतर या सनकी शिक्षकाने स्वत:वरही वार केले. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या लक्षात हे सर्व येताच त्यांनी चंदा यांना बोदवड येथील रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आलं. के. ई. पाटील यांनाही जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आल आहे. पोलिसांनी घटनेची चौकशी सुरु केली आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

लायसन्स मिळविणे झाले सोपे