Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Wednesday, 26 March 2025
webdunia

एमआयएम नगरसेवक व या कॉंग्रेस महिला नेत्याचे प्रेमसबंध, मात्र महिला नेत्याची झाली हत्या

एमआयएम नगरसेवक व या कॉंग्रेस महिला नेत्याचे प्रेमसबंध, मात्र महिला नेत्याची झाली हत्या
, शनिवार, 18 मे 2019 (10:42 IST)
सोलापूर जिल्ह्यत  कर्नाटकातील विजयपूरच्या काँग्रेस नेत्या रेश्मा पडकेनूर यांच्या हत्येने खळबळ उडाली आहे. सोलापुरातील एमआयएम नगरसेवक तौफीक शेख यांच्याविरोधात सादर बाजार पोलीस स्टेशनमध्ये विनयभंग आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार रेश्मा यांनी  दिली होती. तेव्हापासून रेश्मा बेपत्ता झाल्या होत्या. अखेर त्यांची हत्या झाल्याचं उघड झाले आहे. सोलापुरातील एमआयएमचे शहरअध्यक्ष आणि नगरसेवक तौफीक शेख यांच्या विरोधात सोलापुरातील सदर बाजार पोलीस स्टेशनमध्ये विनयभंगाची तक्रार मागील महिन्याच्या 17 तारखेला दिली होती. तक्रार दिल्यापासून रेश्मा गायब होत्या. मात्र कर्नाटकातील विजयपूर जिल्ह्यातील कोलार येथे मृतदेह सापडला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तौफिक शेख आणि रेश्मा यांच्यामध्ये प्रेमसंबंध होते. त्यामुळे तौफिक शेख यांच्या पत्नीने रेश्मा यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती , रेश्माने तौफिक शेखच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी हा मृतदेह शवविच्छेदनासाठी ताब्यात घेतला आहे. शवविच्छेदन अहवालनानंतर हत्या कशी करण्यात आली हे स्पष्ट होणार आहे. मात्र सध्या तरी यामागे एमआयएमचे तौफीक शेख यांच्याभोवती संशयाची सुई आहे. या प्रकारामुळे सोलापूर आणि कर्नाटक भागात या सर्व प्रकाराची जोरदार चर्चा आहे. तर राजकीय वातावरण तापले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

घोर कलयुग जन्मदात्या आईवरचा बलात्कार, जिल्हा हादरला