घोर कलयुग जन्मदात्या आईवरचा बलात्कार, जिल्हा हादरला

शनिवार, 18 मे 2019 (10:35 IST)
सातारा जिल्हा हा बलात्काराच्या घटनेने पूर्णपणे हादरला असून, काय प्रतिक्रिया द्यावी असे नागरिक म्हणत आहेत. माणुसकी आणि नाते समाज या सर्वाना काळीमा फासणारी अत्यंत संतापजनक घटना घडली आहे. मुलाने जन्मदात्या आईवरच बलात्कार केल्याचा प्रकार वाई तालुक्यातल्या एका गावात घडला आहे. यावेळी वडिलांनी हस्तक्षेप केल्यानंतर त्यांनाही मुलाने दगडाने जबर मारहाण केली आहे. वाई तालुक्यात संताप व्यक्त केला जातो आहे. भुईंज पोलीस ठाण्यात नराधमाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या नराधम मुलाची आई,  वडील लग्नासाठी दुसऱ्या गावी  गेले होते.
 
तेथील गावदेव करून झाल्यावर आरोपीची आई एकटीच घरी निघून आली होती. यावेळी नराधम मुलगा हा घराच्या बाहेर ओट्यावर बसला होता. आई घरात गेल्यानंतर तोही घरात गेला आणि त्याने आतून कडी लावली. यावेळी त्याने जबरदस्ती करत स्‍वतःच्या आईवरच बलात्कार केला आहे. या आईने आरडाओरडा केला व शेजारच्या लोकांनी घटनेची माहिती मुलाच्या वडिलांना दिली. वडिलांनी मुलाला केलेल्‍या कृत्‍याचा जाब विचारल्यावर मुलाने वडिलांनाही दगडाने जबर मारहाण केली आहे. या घडलेल्या घटनेनंतर पीडित महिलेने भुईंज पोलिस ठाण्यात केलेल्‍या या घृणास्‍पद कृत्‍याची माहिती पोलिसांना दिली. या घटनेनंतर संशयित आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. मात्र यामुळे समाजात नैतिकता आणि नाते यामध्ये कसा फरक पडला असून हा अमानुष प्रकाराने नागरिक हैराण झाले आहेत.

वेबदुनिया वर वाचा

पुढील लेख दीडशे वर्ष जुन्या कारागृहाला पहिल्यांदाच बसला दुष्काळाचा फटका