Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बुलढाणा येथे बसस्थानकात प्रेमी युगुलाला प्रेयसीच्या घरच्यांनी चोपले व्हिडियो व्हायरल

lovers in buldhana
, बुधवार, 17 एप्रिल 2019 (16:58 IST)
स्वतःच्या तंद्रीत असलेल्या प्रेमाच्या भावविश्वात रमत एकमेकांसोबत गप्पा करणार्‍या एका प्रेमीयुगलाची मुलीच्या घराकडील मंडळीने चांगलीच धुलाई केली आहे. हा सर्व प्रकार नांदुरा बसस्थानकावर दुपारी २ वाजता घडला आहे. या प्रकरणात काही कळायच्या आत घडलेल्या या घटनेचा बघ्यांनी व्हिडीओही तयार केला. तर काहींनी हा व्हिडीओ चक्क सोशल मिडीयावर व्हायरल केला. यामुळे नांदुरा आणि परिसरात एकच खळबळ उडाली आहे. यामध्ये दोघे बस स्थानक परिसरात गप्पा मारत बसले होते. या दोघांवर मुलीच्या घरच्यांना संशय होता. त्यांचा पाठलाग करत घरातील पुरुष मंडळी बस स्थानक परिसारत आली, त्यांनी या दोघांना बोलताना पाहिले. त्या युवकाला काही विचारायच्या आत त्याला जबर मारहाण करायला सुरुवात केली. त्याला बस स्थानकात सर्व प्रवासी लोकांसमोर जोरदार मारले, त्याला जमिनीवर झोपवून मारहाण केली.यावेळी त्याची प्रेयसी ने तिच्या घरातील लोकांना समजवून सांगायचा प्रयत्न केला मात्र तीला देखील बेदम मारहाण केली आहे. यावेळी त्या ठिकाणी उभ्या लोकांनी मदत न करता त्या दोघांना मार देताना व्हिडियो शूट केला आहे. तर अजून हद्द की तो फेसबुकवर अपलोड केला आहे. हा व्हिडियो प्रचंड व्हायरल झाला आहे. या प्रकरणातील नावे अजूनतरी समोर आली नाहीत मात्र  व्हिडियो प्रचंड व्हायरल झाला आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

काळा नवरा नको म्हणून बायकोने नवऱ्याला झोपेत जाळून मारले