आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना १० टक्के आरक्षण देण्याच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टानं राज्य सरकारला सणसणीत चपराक लगावली आहे. खोटे बोलून जनतेच्या डोळ्यात धूळ फेकणे ही तर भाजपाची खासियत! अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी ट्विटद्वारे टीकास्त्र सोडले.
मुख्यमंत्री प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करण्याचा दावा खरे. पण, न्यायालयासमोर फेल कसे होतात, असा प्रश्न उपस्थित करून मुख्यमंत्र्यांचा खरपूस समाचारही घेतला. याआधी मराठा आणि आता वैद्यकीय शिक्षणातील आरक्षणावरील स्थगितीनंतर हे स्पष्ट होते की, सुप्रीम कोर्टाने राज्यातील भाजप सरकारच्या नियोजनशून्य कारभाराचे वाभाडे काढले आहेत.