महाबळेश्वरचे तापमान घसले आहेत. गुरुवारपर्यंत १६ अंश सेल्सियसच्या आसपास असलेलं इथलं तापमान अचानक ३ अंश सेल्सियसपर्यंत खाली घसरलं. शुक्रवारी नोंदवण्यात आलेलं हे तापमान श्रीनगरमधल्या तापमानापेक्षाही कमी होतं.
शुक्रवारी हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार श्रीनगरचे तापमान ५.३ अंश सेल्सियस इतके होते तर महाबळेश्वरचे तापमान ३ अंश सेल्सियस इतके होते. इथल्या कमाल तापमानात इतकी घट का झाली याचं कारण मात्र अजून कळू शकलेलं नाही. हवामान खात्याने २४ मार्च आणि २५ मार्च रोजी मध्य महाराष्ट्रात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तवला आहे. तापमानातील हे बदल सामान्य नागरिकांसाठी कुतूहलाचा विषय बनले आहेत.