Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Mahagenco Recrutiment Examination paper leak : महाजेनको' मधील भरती परीक्षेचा पेपर फुटला !

exam
, रविवार, 8 ऑक्टोबर 2023 (13:34 IST)
Mahagenco Recrutiment Examination paper leak : सध्या राज्यात पेपरफुटीच्या बातम्या येत आहे. आता महानिर्मिती पदाच्या भरतीसाठी  होणाऱ्या परीक्षेचा पेपर फुटल्याची बातमी येत असून असा दावा स्पर्धा परीक्षा समन्वय समिती कडून घेण्यात आला आहे. या विषयावरून विरोधक आक्रमक होण्याची शक्यता वर्तवली जात असून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. 

परीक्षा सुरु असताना प्रश्नपत्रिकेचे बटन केमेऱ्याने काढलेले फोटो समोर आले असून पेपर फुटल्याचे पुरावे असल्याचा दावा स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने केला आहे.  

राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळ असलेल्या ऊर्जा खात्यातील पेपर फुटले आहे. या पूर्वी देखील पोलीस भरतीचा पेपर फुटला होता. आता महाजेनको म्हणजेच महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनीच्या स्पर्धा परीक्षेचा पेपर फुटला आहे. फुटलेले पेपर त्यांच्याकडे असल्याचा दावा देखील स्पर्धा परीक्षा समन्वय समिती कडून करण्यात आला आहे. 

महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनीच्या विविध पदांसाठी स्पर्धा परीक्षा 19 जून ते 22 जून दरम्यान घेणयात आली होती. त्याचा निकाल ही जाहीर झाला आहे. ही स्पर्धा परीक्षा आयबीपीएस ने घेतली असून 13 ऑगस्ट रोजी पेपर फुटले.

या प्रकरणात काही लोकांची नावे देखील दिली असून या बाबत मुख्यमंत्री कार्यालयात निवेदन देऊन देखील अद्याप चौकशी झालेली नाही. या बाबत आमच्याकडे पुरावा असून त्यावर लवकरात लवकर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशी करावी. अशी मागणी समितीने केली आहे. 
 
Edited by - Priya Dixit 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Satara : ॲड प्रकाश आंबेडकरांची इंडिया आघाडी सोबत जाण्याची घोषणा