Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

निवडणूक जनमत ओपनिंग पोल आणि इतर चाचण्या केल्या बंद

निवडणूक जनमत ओपनिंग पोल आणि इतर चाचण्या केल्या बंद
, मंगळवार, 14 फेब्रुवारी 2017 (15:03 IST)
राज्यात होत असलेल्या १० महापालिका, तर  जिल्हा परिषद तसेच पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये जाहिरातबाजीवर कोट्यावधी रुपयांची उधळपट्टी करणाऱ्या राजकिय पक्षांना आता चांगलेच वळणावर आणले आहे. तर निवडणुकीत मतदान करत असताना कोणताही प्रभाव दिसू नयेया  करिता निवडनुक आयोगाने कठीण निर्णय घेतला आहे . यामध्ये  निवडणुकांचे दोन्ही टप्पे पाठोपाठ असल्याने मतदारांवर पडणारा संभाव्य प्रभाव लक्षात घेऊन प्रचाराचा कालावधी संपल्यानंतर राजकीय पक्ष , उमेदवारांना वृत्तपत्रे आणि इलेक्‍ट्रॉनिक माध्यमांत प्रचारविषयक जाहिराती प्रसिद्ध करता येणार नाहीत. त्याचबरोबर 14 फेब्रुवारी रोजी रात्री बारा वाजल्यापासून ते 21 फेब्रुवारी 2017 रोजी मतदान समाप्तीपर्यंत जनमत (ओपिनियन पोल) व मतदानोत्तर (एक्‍झिट पोल) चाचण्यांचे निष्कर्ष प्रसिद्ध करण्यावर बंदी घालण्यात आली आहे, असे राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी सांगितले.त्यामुळे या पक्षाची हवा तो पक्ष पुढे आणि हा उमेदवार निवडून येणार असे कोणतेही चित्र निर्माण करता येणार नाही, त्यामुळे मतदार आपले मत योग्य पद्धतीने विना प्रभावाचे देवू शकणार आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

तामिळनाडू तापले : पनीरसेल्वम यांची एआयडीएमकेतून हकालपट्टी