Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Saturday, 12 April 2025
webdunia

अजित पवारांनी केली शरद पवारांच्या तब्बेतीची विचारपूस

Maharashtra News update
, सोमवार, 27 जानेवारी 2025 (21:50 IST)
Maharashtra Marathi Breaking News Live Today: अजित पवार आणि शरद पवारांच्या एकत्र होण्याच्या चर्चेला उधाण आले आहे. या चर्चे दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना फोन करुन त्यांच्या प्रकृतीची विचारणा केली. तेव्हा पासून अनेक प्रकारच्या चर्चा सुरु झाल्या..राज्यात घडत असलेल्या सर्व घडामोडींवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. तर बघू आज दिवसभरात काय घडतं ते....

लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र महिलांच्या अर्जांची छाननी केली जात आहे आणि त्यांचे अर्ज नाकारले जातील. राज्यात सुरू असलेल्या या चर्चेदरम्यान, मंत्री अदिती तटकरे यांनी याबाबत मोठे विधान केले आहे. सविस्तर वाचा

महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यात रविवारी एका तीर्थयात्रेदरम्यान प्रसाद खाल्ल्यानंतर 50 हून अधिक लोक अचानक आजारी पडले. यानंतर पीडितांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. सविस्तर वाचा

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच, त्यांनी ठाण्यात आयोजित एका कार्यक्रमात भाग घेतला, जिथे त्यांनी अनेक महत्त्वाचे निर्णयही घेतले. सविस्तर वाचा

महाराष्ट्रातील पुण्यामध्ये वाढत्या गुलियन-बॅरे सिंड्रोमच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकार सतर्क झाले आहे. या आजाराशी लढण्यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलली आहे आणि ज्या गरीबांना त्याचा उपचार परवडत नाही त्यांच्यासाठी मोठी घोषणा केली आहे. सविस्तर वाचा

महाराष्ट्रात भव्य विजयानंतर, महायुतीने शिर्डीमध्ये कार्यकर्त्यांचे कौतुक करण्यासाठी एक महाअधिवेशन आयोजित केले होते, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीनेही नवसंकल्प शिबिराचे आयोजन केले होते, ज्यावर संजय राऊत संतापले. सविस्तर वाचा

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी मुंबई कोस्टल रोडला वांद्रे-वरळी सी लिंकशी जोडणाऱ्या पुलाचे उद्घाटन केले. सविस्तर वाचा

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी मुंबई कोस्टल रोडला वांद्रे-वरळी सी लिंकशी जोडणाऱ्या पुलाचे उद्घाटन केले. सविस्तर वाचा

महाराष्ट्रात गुलियन-बॅरे सिंड्रोम आता मृत्यूला कारणीभूत ठरण्याच्या सुरुवातीच्या टप्प्यात पोहोचला आहे. आतापर्यंत पुण्यात या सिंड्रोमने अधिक लोकांना प्रभावित केले आहे आणि आता सोलापुरातही एका मृत्यूची बातमी समोर आली आहे. सविस्तर वाचा

महाराष्ट्रातील पुण्यात गुलियन-बॅरे सिंड्रो (GBS) चे रुग्ण सतत वाढत आहे. जीबीएस हा एक दुर्मिळ आणि प्राणघातक आजार मानला जातो. यामुळे अमेरिकेच्या एका माजी राष्ट्राध्यक्षालाही आपला जीव गमवावा लागला आहे. सविस्तर वाचा

महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील भिलवडी गावातील मुख्य बाजारपेठेत लोक दररोज सकाळी राष्ट्रगीत म्हणतात. ही परंपरा 15 ऑगस्ट 2020 रोजी सुरू झाली जी आता अधिक मजबूत होत आहे आणि इतर काही भागातील लोक देखील तिचा अवलंब करत आहेत. हे गाव पलूस तालुक्यात कृष्णा नदीच्या काठावर वसलेले आहे.

पुण्यातील वाढत्या गुलियन-बॅरे (Guillain Barre) सिंड्रोमच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकार सतर्कतेच्या मार्गावर आले आहे. या आजाराशी लढा देण्यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलली असून, ज्या गरिबांना उपचार घेणे परवडत नाही त्यांच्यासाठी मोठी घोषणा केली आहे.या सिंड्रोमचा परिणाम नवजात बालकांपासून ते 60 वर्षांवरील वृद्धांपर्यंतच्या लोकांमध्ये दिसून येत आहे.सविस्तर वाचा....

दिल्लीतील शाळांना बॉम्बस्फोटने उडवून देण्याच्या धमकी नंतर आता मुंबईतील शाळांना बॉम्ब स्फोट घडवून येण्याची धमकी देण्यात आली आहे. मुंबईतील कांदिवली परिसरातील इराणीवाडी येथील एका इंटरनेशनल स्कूलला बॉम्बची धमकी देण्याची ईमेल द्वारे देण्यात आली आहे. या मेलला गांभीर्याने लक्षात घेत शाळेने बॉम्ब शोधक पथक आणि पोलिसांना कळवण्यात आले आहे.मुंबई पोलिसांनी शाळा रिकामी करुन अधिक तपास करत आहे. सविस्तर वाचा....  

'देव तारी त्याला कोण मारी' हे डोंबिवलीतील देवीचापाडा परिसरात एक चमत्कारिक घटना पाहायला मिळाली. या घटनेने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.या घटनेचा एक व्हिडिओ 26 जानेवारीला समोर आला आहे.  सविस्तर वाचा....  
 

ज्येष्ठ नागरिकाला मारहाण केल्याप्रकरणी पुणे महापालिकेचे माजी स्थायी समिती अध्यक्ष आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी बाबुराव चांदेरे यांच्याविरोधात बावधन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमुळे हे प्रकरण चर्चेत आले आहे. याप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत चांदेरे यांना सज्जड दम दिला आहे. सविस्तर वाचा.... 

अजित पवार आणि शरद पवारांच्या एकत्र होण्याच्या चर्चेला उधाण आले आहे. या चर्चे दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना फोन करुन त्यांच्या प्रकृतीची विचारणा केली. तेव्हा पासून अनेक प्रकारच्या चर्चा सुरु झाल्या. सविस्तर वाचा....  

मराठा आरक्षणाचे कार्यकर्ते मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा 25 ते 26 जानेवारीच्या मध्यरात्रीपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे. जरांगे यांच्या उपोषणाचा सोमवारी तिसरा दिवस आहे. दरम्यान, मंत्री पंकजा मुंडे यांच्या वक्तव्यावर मनोज जरांगे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, मी जातवादी नाही आणि दहशतवादीही नाही. माझे कोणाशीही वैर नाही. "हा शांततापूर्ण निषेध आहे आणि येथे कोणाचेही स्वागत आहे." सविस्तर वाचा....  
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मनोज जरांगे यांना भेटण्यासाठी पंकजा मुंडे जाणार