महाराष्ट्रात कोरोनाची रुग्णसंख्याही वाढत चालली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सहा राज्यांना कोविड संवेदनशील राज्य म्हणून घोषित करण्यात आली आहेत. केरळ, गोवा, राजस्थान, गुजरात, दिल्ली आणि उत्तराखंड या सहा राज्यांतून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांना कोरोना चाचणी बंधनकारक असणार आहे. तसेच लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये कोविड संदर्भातील नियमाचे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
राज्य सरकारकडून रेल्वेच्या लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी 'ब्रेक द चैन'अंतर्गत कोविड नियमावली तयार करण्यात आली आहे. त्यानुसार रेल्वेतून प्रवास करताना आणि महाराष्ट्रात येणाऱ्यांसाठी negative corona test report बंधनकारक आहे. केरळ, गोवा, राजस्थान, गुजरात, दिल्ली आणि एनसीआर, उत्तराखंड या सहा राज्यांना कोविड संवेदनशील राज्य म्हणून घोषित करण्यात आली आहेत. यानुसार या सहा राज्यांतून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांना 48 तास आधी कोरोना चाचणी अनिर्वाय आहे. तसेच या कोविड चाचणीचा रिपोर्ट निगेटिव्ह असेल त्यांनाच महाराष्ट्रात प्रवेश दिला जाणार आहे, असे यात म्हटलं आहे.