Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

महाराष्ट्र: जयपूर-मुंबई चालत्या ट्रेनमध्ये गोळीबार, 4 प्रवासी ठार

महाराष्ट्र:  जयपूर-मुंबई चालत्या ट्रेनमध्ये गोळीबार,  4 प्रवासी ठार
, सोमवार, 31 जुलै 2023 (08:40 IST)
महाराष्ट्रातील पालघरमधून मोठी बातमी येत आहे. जयपूर मुंबई पॅसेंजर ट्रेनमध्ये झालेल्या गोळीबारात चार जणांचा मृत्यू झाला आहे. ही ट्रेन गुजरातहून मुंबईकडे येत होती. मृतांमध्ये आरपीएफच्या एएसआयसह 3 प्रवासी आहेत. 
आरपीएफच्या कॉन्स्टेबल चेतनने सगळ्यांना गोळ्या घातल्या आहेत. गोळीबाराची ही घटना वापी ते बोरीवलीमीरा रोड स्थानका दरम्यान घडली. मीरा रोड बोरिवली दरम्यान जीआरपी मुंबईच्या जवानांनी काल या कॉन्स्टेबलला ताब्यात घेतले. 
 
जयपूर एक्सप्रेस मध्ये ही घटना आज पहाटे 5.23 वाजता घडली. आरपीएफ जवान आणि एएसआय दोघेही ट्रेनमध्ये प्रवास करत होते. दरम्यान, कॉन्स्टेबल चेतनने एएसआयवर अचानक गोळीबार केल्याने प्रवासी प्रवाशांमध्ये घबराट पसरली.  

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, आज सकाळी 5.23 वाजता, ट्रेन क्रमांक 12956 जयपूर एस मध्ये बी5 मध्ये गोळी असल्याची माहिती मिळाली. एस्कॉर्ट ड्युटीमध्ये सीटी चेतनने एस्कॉर्ट इनचार्ज एएसआय टिका राम यांच्यावर गोळीबार केल्याची माहिती मिळाली . ट्रेन बोरिवली रेल्वे स्थानकावर पोहोचली आहे. माहितीनुसार, ASI व्यतिरिक्त 3 नागरीकांचा मृत्यू झाला आहे.या जवानाला पकडण्यात आले आहे 
 
आरोपीचा हेतू काय होता आणि त्याने ही गोळी का चालवली हे समजू शकले नाही. सुदैवाने या गोळीबारात आणखी प्रवासी जखमी झाले नाहीत. चालत्या ट्रेनमध्ये गोळीबार  होताच ट्रेनमध्ये एकच खळबळ उडाली. सध्या पोलीस ट्रेनमधील प्रवाशांचे जबाबही नोंदवत आहेत. पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. 
 
 

Edited by - Priya Dixit 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पुणे : राज्यातील सात साखर कारखान्यांना आरआरसीनुसार नोटिसा