‘हमको मालूम है ‘वायरस’ की हक़ीक़त लेकिन
ख़ुद को ‘सेफ़’ रखने को ग़ालिब ये ‘मकान’ अच्छा है ‘
असा शायरी आधार राज्यातील पोलिसांनी घेतला आहे आणि लोकांना घरात राहण्याचं आवहन करत आहे. राज्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे मुख्यमंत्र्यांसह, प्रशासन आणि सेलिब्रिटींसह सर्वांना घरात रहा असं आवहन करत आहे. त्यात महाराष्ट्र पोलिसांनी वेगळा पर्याय निवडत शरो शायरी शैलीत लोकांना समजवण्याचा प्रयत्न केला आहे.
शायरीतून धोक्याचा इशारा देत पोलिसांनी लोकांना सुरक्षित ठेवण्यासाठी घरात राहण्यापेक्षा चांगला पर्याय नाही असं पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे.
ट्विटवर संदेश देण्यात येत आहे की
हज़ारों ख़्वाहिशें ऐसी कि हर ख़्वाहिश पे दम निकले
बहुत निकले मेरे अरमान घर से हम न निकले
राज्यात मंगळवारी एकूण ८२ नवीन रुग्णांची नोंद झाली असून राज्यातील एकूण करोना बाधित रुग्णांची संख्या ३०२ झाली आहे.