Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Maharashtra Rain Update : मुंबईसह या जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट

rain
, मंगळवार, 25 जुलै 2023 (11:08 IST)
सध्या राज्यात मुसळधार पाऊस सुरु आहे . पावसामुळे अनेक भागात पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. राज्यात पावसाचा वाढत जोर पाहत हवामान खात्यानं मुंबई, ठाणे जिल्हा, रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीत ऑरेंज अलर्ट जारी केले आहे. तर पुणे, कोल्हापूर,सातारा घाटात देखील या आठवड्याभर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 
 
मराठवाड्यातील काही भागात परभणी, हिंगोलीत बुधवारी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे तर नांदेड, लातूर जिह्यात गुरुवारी मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. विदर्भाच्या सर्व जिल्ह्यात आणि भंडारा, चंद्रपूर, यवतमाळ आणि गडचिरोली मध्ये विजांचा कडकडाटासह येत्या तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली असून या भागात ऑरेंज अलर्ट दिला आहे.

कोकण भागात रायगड, रत्नागिरी, सिधुदुर्ग जिह्यात ऑरेंज अलर्ट जारी केलं आहे. मुंबईत आज मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ठाणे जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी केले आहे. नागरिकांनी अत्यावश्यक काम असल्यास घरातून बाहेर पडण्याचे सांगण्यात आले आहे. 
 
 Edited by - Priya Dixit 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Pune : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सह सरकार्यवाह मदनदास देवी यांचे आज पुण्यात अंत्यसंस्कार