महाराष्ट्रातील रत्नागिरीला सोमवारी सकाळी भूकंपाचा धक्का बसला. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 4.0 मोजली गेली. नॅशनल सेंटर ऑफ सिस्मॉलॉजी (NCS) नुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू मुंबईपासून 350 किमी अंतरावर असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यात होता. भूकंपाचा स्त्रोत जमिनीच्या 5 किमी खाली नोंदवला गेला.
NCS प्रमुख जेएल गौतम यांनी दिलेल्या माहितीनुसार, पहाटे2.36 च्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले. लोक झोपले असताना त्यांना भूकंपाचे धक्के जाणवले, लोकांमध्ये खळबळ उडाली होती. मात्र, यामध्ये अद्याप कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्याचे वृत्त नाही.