suvichar

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेचा निकाल जाहीर

Maharashtra State Examination Council
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेचा बहुप्रतीक्षित निकाल अखेर जाहीर झाला आहे. या परीक्षेत एकूण 50,369 उमेदवार पात्र ठरले.
 
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने जाहीर केलेल्या यंदाच्या शिक्षक पात्रता परीक्षेच्या निकालात 50,369 उमेदवारांनी घवघवीत यश संपादन केले आहे. या निकालाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे यात प्राथमिक स्तरासाठीचा पेपर 1 आणि माध्यमिक स्तरासाठीचा पेपर 2 अशा दोन्ही स्तरांवरील निकालांचा समावेश असून पात्र उमेदवारांच्या संख्येत सकारात्मक वाढ  झाली आहे. परीक्षा परिषद कडून यंदाचा निकाल पारदर्शक पद्धतीने आणि काटेकोर नियमांचं पालन करून जाहीर करण्याचा दावा केला जात आहे.
  
या निकालाची माहिती राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी दिली. टीईटी परीक्षा परीक्षा परिषदेकडून 23 नोव्हेंबर 2025 रोजी राज्यभरातील 37 जिल्हा केंद्रावर टीईटी परीक्षा घेण्यात आली. परिक्षेची अंतरिम उत्तर सूची 19 डिसेंबर 2025 रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. 
 
पात्र ठरलेल्या उमेदवारांना आता शिक्षक भरतीच्या ‘पवित्र’  प्रणालीद्वारे नोंदणी करता येणार आहे. जिल्हा परिषद, नगरपालिका आणि खाजगी अनुदानित शाळांमधील शिक्षक भरतीसाठी हे प्रमाणपत्र अत्यंत महत्त्वाचे असणार आहे.
Edited By - Priya Dixit  
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मुकेश अंबानी म्हणाले की, एआय देशाचे भाग्य बदलेल - पुढील दोन-तीन दशकांत भारत 30 ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनेल