Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

'यूपीएससी'च्या निकालावर महाराष्ट्राची मोहोर ; तीन विद्यार्थ्यांची नावे आली समोर

upse cse results
, मंगळवार, 16 एप्रिल 2024 (20:44 IST)
यूपीएससी परीक्षा 2023 मध्ये दिलेल्या उमेदवारांसाठी सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाने आज परिक्षेचा निकाल जाहीर केला आहे. यूपीएससीचा अंतिम निकाल मंगळवारी म्हणजे आज जाहीर करण्यात आला आहे. उमेदवारांना अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर त्यांचा निकाल पाहता येणार आहे. केंद्रीय लोक सेवा आयोगाच्या २०२३ च्या परीक्षेत महाराष्ट्रातील तीन विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
 
राष्ट्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये आदित्य श्रीवास्तव देशात रँक एक आला आहे. महाराष्ट्रातील उमेदवारांचा देखील यादीमध्ये समावेश आहे. पहिल्या १०० जणांच्या यादीमध्ये अनिकेत हिरडे याचे नाव असून त्याची रँक ८१ आहे.  
 
महाराष्ट्रातील प्रियांका सुरेश मोहिते हिचा रँक ५९५ आला आहे, तर अर्चित डोंगरे याचा रँक १५३ आहे. २०२३ मध्ये यूपीएससीच्या ११४३ पदांसाठी जाहीरात निघाली होती. मुख्य परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना ९ एप्रिल २०२४ रोजी मुलाखतीसाठी बोलावण्यात आलं होतं. त्यांनतर आज निकाल जाहीर करण्यात आलाय.
 
उमेदवारांचे मार्क निकालाच्या घोषणेनंतर १५ दिवसांनी जाहीर करण्यात येतील. मुख्य परीक्षेमध्ये २८४६ उमेदवार उत्तीर्ण झाले होते. यातील जवळपास ७० उमेदवार हे महाराष्ट्रातील होते. यूपीएससीच्या परीक्षमध्ये १८० आयएएस, २०० आयपीएस आणि ३७ आयएफएस पदांसाठी भरती निघाली होती. दरम्यान निकालामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.

Edited By - Ratnadeep Ranshoor 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

राज्यभरात उष्णतेची लाट, कोणत्या जिल्ह्यात किती आहे तापमान? वाचा