Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Wednesday, 2 April 2025
webdunia

महाराष्ट्रात द काश्मिर फाइल्स टॅक्स फ्री करा, नितेश राणे यांनी मागणी

Make The Kashmir Files Tax Free in Maharashtra
, सोमवार, 14 मार्च 2022 (15:02 IST)
दिग्दर्शक अग्निहोत्री यांचा द काश्मिर फाइल्स हा चित्रपट चर्चेत आहे. या चित्रपटाला पंजाब सरकार, हरियाणा सरकार आणि मध्य प्रदेशमध्ये टॅक्स फ्री केले आहे. आता भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून हा चित्रपट महाराष्ट्रात टॅक्स फ्री करा अशी मागणी केली आहे.
 
भाजपा आमदार राणे यांनी ट्वीट केलं आहे. हे ट्वीट करत ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना म्हणाले, “जम्मु काश्मीरमध्ये मुस्लीम दहशवादाला बळी पडलेल्या हिंदुंचं चित्रण करणाऱ्या ‘द काश्मीर फाईल्स’ हा चित्रपट राज्यात टॅक्स फ्री म्हणजेच करमुक्त करावा”, अशी मागणी नितेश राणे यांनी केली आहे. पुढे ते म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी हा चित्रपट करमुक्त केल्यास, मुस्लीम दहशतवाद्यांनी जम्मु काश्मीर येथील हिंदु समाजावर अत्याचार केल्याचे खरे चित्रीकरण देशातल्या जनतेला पाहता येईल. हा चित्रपट महाराष्ट्रातील जनतेला लवकर पाहता यावा यासाठी करमुक्त करावा ही विनंती, असे आवाहन त्यांनी केलं आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

काय म्हणता, अहमदनगरमध्ये गणिताचा पेपर फुटल्याची चर्चा