रेल्वे सुरु असताना चढू आणि उतरू नये अशी सूचना रेल्वे प्रशासनाकडून वारंवार दिली जाते. रेल्वेचे रूळ पार करू नये असे ही सांगितले जाते तरीही काही लोक घाई गर्दीत हे करतात. धावत्या रेल्वेला पकडणं हे धोकादायक असतं.
तर कधी लोकांच्या निष्काळजीपणामुळे त्यांना जीव गमवावा लागतो. असे काहीसे घडले आहे मालाड रेल्वे स्थानकावर रेल्वेचा धक्का लागून एका तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.सीसीटीव्ही फुटेज मध्ये ही घटना कैद झाली आहे.
या व्हिडीओ मध्ये दोन तरुण मालाडच्या रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्म तीनवर जेवणाचा डबा खाऊन आणि नंतर रेल्वे ट्रॅक वरडबा आणि हात धुण्यासाठी गेले असता चर्चगेटच्या दिशेने बोरिवली कडे जाणारी जलद लोकलची धडक लागून प्लॅटफॉर्मवर दूरपर्यंत फेकला गेला धडक एवढी जोरदार होती की तरुणाचा डोक्याला जोरदार मार लागला.त्यामुळे त्यांच्या कानातून रक्तस्त्राव झाला त्याला उपचारासाठी कांदिवलीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.