Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मलिकांचा कोठडीतील मुक्काम वाढला

nawab malik
मुंबई , सोमवार, 18 एप्रिल 2022 (21:48 IST)
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी आर्थिक हितसंबंध आणि मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली न्यायालयीन कोठडीत  असलेले अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना आजही न्यायालयाकडून दिलासा मिळाला नाही. न्यायालयाने मलिकांच्या कोठडीत 22 एप्रिलपर्यंत वाढ केली आहे.
 
मनी लाँड्रिंग प्रकरणात मलिकांना 23 फेब्रुवारी रोजी ईडीने अटक केली होती. तेव्हापासून मलिक तुरूंगात आहेत. 4 एप्रिल रोजी झालेल्या सुनावणीवेळी न्यायालयाने मलिकांच्या कोठडीत 18 एप्रिलपर्यंत वाढ केली होती. आज कोठडी संपत असल्याने त्यांना मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए न्यायालयात हजर करण्यात आलं. त्यावेळी न्यायालयाने मलिकांच्या कोठडीत 22 एप्रिलपर्यंत वाढ केली.
 
दरम्यान, या प्रकरणी नवाब मलिक यांनी आपल्या तातडीच्या सुटकेसाठी आणि ईडीच्या कारवाईविरोधात सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. आपली अटक ही बेकायदा असल्याचा दावा त्यांनी या याचिकेतून केला आहे. या याचिकेवर लवकरच सुनावणी होणार आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

नाशिक शहरातील पाणीपुरवठ्याबाबत महापालिकेने दिली अतिशय महत्वाची अपडेट…