राहुल गांधींची भारत जोडो यात्रा नांदेडमध्ये पोहोचल्यावर इथे झालेल्या जाहीर सभेत महाराष्ट्रातील ज्येष्ठ काँग्रेस नेते उपस्थित होते.
याच सभेत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी मराठीतून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. त्यांनी पंतप्रधान मोदींवर आरोप केले. येथे गुरुवारी भारत जोडो यात्रेनिमित्त झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. घणाघात आरोप करताना खर्गे म्हणाले, आज जो काही विकास दिसत आहे, तो काँग्रेसनेच केला. पण, भाजपकडून फक्त समाजात द्वेष, जातीत भांडणे लावण्याचे काम केले जात आहे.
ते म्हणाले काँग्रेसने संविधानाचे रक्षण केले नसते तर नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले नसते. दरवर्षी मोदीजींनी 2 कोटी नोकऱ्यांचे आश्वासन दिले होते त्याचे काय झाले ? फक्त 75 हजार नोकऱ्या दिल्या गेल्या 18 कोटी नोकऱ्यांचे काय ? मोदी सरकार विमानतळ आणि बंदरे विकत आहे आम्ही संविधान वाचवले म्हणून तुम्ही पंतप्रधान झाला. देशाची संपत्ती इतर लोकांचा हाती जात आहे. असा घणाघात पंत प्रधान मोदींवर मल्लिकार्जुन खर्गे यांनी केला.
Published By - Priya Dixit