आता लवकरच गणपती बाप्पा येणार, गणेशोत्सवासाठी मंडळांकडून मोठे मंडप बनतात. या साठी त्यांना महानगरपालिकेकडून तसेच वाहतूक पोलीस आणि मुंबई अग्निशमन दला कडून परवानगी घ्यावी लागते. आता मंडळांची धावपळ वाचणार असून गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेकडून मंडपाची परवानगी घेण्यासाठी मंडळांना 'एक खिडकी' पद्धतीने अर्ज करण्याची सुविधा दिली आहे. ही सुविधा येत्या 1 ऑगस्ट पासून सुरु होणार आहे.
या साठी काही नियम देखील आहे. मंडळांकडून घेतले जाणारे विविध उत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने आयोजित केले जावे. आणि यासाठी केली जाणारी परवानगी प्रक्रिया सहज आणि सरळ होण्यासाठी महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल आणि महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी दिलेल्या मार्गदर्शनानुसार, मंडळ विविध उपक्रम राबवतात. या साठी घेतली जाणारी परवानगीची प्रक्रिया अधिक सुरळीत होण्यासाठी एक खिडकी योजना उपलब्ध करण्याची माहिती उप आयुक्त परिमंडळ 2 रमाकांत बिरादार यांनी दिली.
अर्ज करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या अधिकृत संकेत स्थळ https://portal.mcgm.gov.in वर अर्ज सुविधा उपलब्ध होणार असून 1 ऑगस्ट पासून ते 13 सप्टेंबर 2023 पर्यंत मंडपासाठी अर्ज करता येणार आहे.
या अर्जात पोलीस, वाहतूक पोलीस आणि अग्निशमन दलाच्या परवानगीचा अर्ज असल्यामुळे वेगळ्याने या विभागाकडे अर्ज द्यावा लागणार नाही.मंडप परवानगी निशुल्क दिली जाईल. मंडपाच्या परवानगीसाठी एक हजार रुपयांची सुरक्षा अनामत रक्कम भरावी लागणार.अर्जासोबत गणेश मंडळांना हमीपत्र द्यावे लागणार. काहीही अडचण आली असल्यास गणेश मंडळांनी आपल्या विभागातील सहाय्यक आयुक्तांशी संपर्क करण्याचे गणेशोत्सवाचे समन्वयक रमाकांत बिरादार यांनी म्हटले आहे.