Publish Date: Tue, 16 Dec 2025 (19:27 IST)
Updated Date: Tue, 16 Dec 2025 (19:28 IST)
नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने अपार्टमेंट घोटाळ्यात राज्याचे क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. मुख्यमंत्री कोट्याअंतर्गत फ्लॅट घेण्याचा खटला १९९७ पासून प्रलंबित होता.
मिळलेल्या माहितीनुसार महाराष्ट्राचे क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांच्या अडचणी वाढल्या आहे. मंगळवारी नाशिक जिल्हा आणि सत्र न्यायालयाने त्यांना अपार्टमेंट घोटाळ्यात दोन वर्षांची सक्तमजुरी आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. न्यायालयाने ही शिक्षा तात्काळ लागू करण्याचे आदेश दिले आहे, त्यानंतर कोकाटे बंधूंना कधीही अटक करण्यात येईल अशी माहिती समोर आली आहे.
न्यायालयाने आपल्या निकालात मंत्री कोकाटे आणि त्यांचे भाऊ विजय कोकाटे यांना दोन वर्षांची सक्तमजुरी आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. जिल्हा आणि सत्र न्यायाधीश पी.एम. बदर यांनी अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी रूपाली नरवाडिया यांना ही शिक्षा तात्काळ लागू करण्याचे आदेश दिले आहे. शिक्षा सुनावल्यानंतर, न्यायालय आरोपी माणिकराव कोकाटे आणि त्यांचे भाऊ विजय कोकाटे यांच्याविरुद्ध कधीही अटक वॉरंट जारी करू शकते. सत्र न्यायालयाने आपल्या निकालात अपार्टमेंट घोटाळ्यात नरवाडिया न्यायालयाचा पूर्वीचा निर्णय कायम ठेवला. अखेर, या अपार्टमेंट घोटाळ्यात कोकाटे बंधूंना दोषी ठरवण्यात आले आहे.
मुख्यमंत्री कोटा अपार्टमेंट घोटाळा म्हणजे काय?
मुख्यमंत्री कोटा अपार्टमेंट घोटाळा अंतर्गत राखीव असलेल्या १०% कोट्याचा वापर केल्याचा आरोप कोकाटे बंधूंवर होता. आरोपांनुसार, त्यांनी बनावट कागदपत्रे वापरून या कोट्याअंतर्गत चार अपार्टमेंट मिळवले. हे अपार्टमेंट नाशिक शहरातील कॅनडा कॉर्नर सारख्या प्रमुख ठिकाणी आहे.
Edited By- Dhanashri Naik